breaking-newsराष्ट्रिय

भारतीय डॉक्टरांनीच करावी शस्त्रक्रिया; सुषमा स्वराज यांचा होता हट्ट

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यांचं ट्विटर हँडल आता शांत असलं तरी अनेक जण आजही त्यांची निरनिराळ्या पद्धतीनं आठवण काढताना दिसतात. अशातच सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल हे अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. स्वराज कौशल यांनी याचदरम्यान एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एम्सचे डॉक्टर्स सुषमा स्वराज यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते, अशी माहिती त्यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विटरवरून दिली.

सुषमा स्वराज यांनी किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी भारताबाहेर जाण्यास नकार दिला होता. त्यांनी आपल्या शस्त्रक्रियेची तारीख ठरवली आणि डॉ. मुकुट मिन्ज यांना म्हणाल्या, तुम्ही फक्त साहित्य पकडा माझी सर्जरी कृष्णा करतील, असं स्वराज यांनी लिहिलेल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. शस्त्रक्रियेनंतर सुषमा स्वराज यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. जर आपण परदेशात जाऊन शस्त्रक्रिया केली असती तर आपल्या देशातील रूग्णालयांवरून आणि आपल्या देशातील डॉक्टरांवरून लोकांचा विश्वास उडाला असता. तसंच ती एक छोटी शस्त्रक्रिया होती, असं त्या म्हणाल्या असल्याचंही त्यांच्या पतीनं नमूद केलं आहे.

https://twitter.com/governorswaraj/status/1191434693402644483

एक परिवार म्हणून सुषमा स्वराज यांच्या उपचारासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत. त्यांच्या उपचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत डॉक्टरांच्या संपर्कात होते. सुषमा स्वराज यांनी कोणताही ताण घेऊ नये, त्यांची प्रकृती महत्त्वाची असल्याचं ते कायम सांगत होते. याबद्दल मी आणि माझी मुलगी बासुरी कायम त्यांचे आभारी राहू असंही स्वराज ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button