breaking-newsराष्ट्रिय

भारताच्या प्रवासी विमानाला पाकच्या F-16नं तासभर घेरलं; ना’पाक’ कुरापती सुरूच

गेल्या महिन्यात पाकच्या दोन एफ-16 या लढाऊ विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या एक भारतीय प्रवासी विमानाला आकाशात घेरलं होतं. जवळपास पाकच्या एफ16 विमानांनी भारताच्या प्रवासी विमानाचा तासभर पाठलाग केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी स्पाइसजेटच्या विमानाला हवेत रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकच्या एफ-16मधील वैमानिकांनी भारतीय विमानाच्या वैमानिकाला विमानाची उंची कमी करून माहिती देण्यास सांगितलं होतं. स्पाइसजेटच्या कॅप्टननं एफ 16 वैमानिकांना सांगितले की, हे स्पाइसजेट आहे; जे भारताचं व्यावसायिक विमान आहे. यात प्रवासी असून, ठरलेल्या वेळेत काबूलला जात आहे. 
..अन् त्यावेळी विमानातील 120 प्रवासी घाबरले
पाकिस्तानच्या एफ 16 विमानानं जेव्हा भारताच्या प्रवासी विमानाला घेरलं, तेव्हा त्यात 120 प्रवासी होते. विशेष म्हणजे ही घटना तेव्हा घडली जेव्हा भारताच्या प्रवेशासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद नव्हती. ही घटना गेल्या 23 सप्टेंबरला झाली आहे. स्पाइसजेटचं विमान एसजी—21 दिल्लीहून अफगाणिस्तानच्या काबूलला जात होते. पाकिस्तानच्या एफ 16 विमानानं भारताच्या स्पाइस जेट विमानाला घेरलं होतं, ते त्या विमानाभोवतीच घिरट्या घालत होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांनीही ती विमानं पाहिली.

एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशानं सांगितलं की, पाकिस्तानी वैमानिक संकेतांच्या माध्यमातून स्पाइसजेटच्या वैमानिकाला विमानाची हवेतील उंची कमी करण्याची सूचना करत होते. प्रत्येक विमानाचा एक कोड असतो. स्पाइसजेटचा कोड ‘एसजी’ आहे. परंतु पाक एटीसीनं तो ‘एआय’ असा वाचला आणि ते भारतीय हवाई दलाचं विमान समजले. पाकला परिस्थिती समजल्यानंतर लढाऊ विमानांनी भारताच्या विमानाला अफगाणिस्तानच्या हवाई सीमेपर्यंत नेऊन सोडले. त्यानंतर पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारी कागदी कारवाई पूर्ण करण्यासाठी काबूलला पोहोचले, त्यामुळे विमानाचा जवळपास पास तास खोळंबा झाला. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button