breaking-newsराष्ट्रिय

भांडणादरम्यान बोट दाखवलं… वाद घालणाऱ्याने चावा घेत बोटाचा तुकडा पाडला अन् गिळला

रस्त्यावर गाडी चालवण्यावरुन झालेल्या वादामध्ये एका व्यक्तीला बोट गमावावे लागल्याची घटना मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये घडली आहे. येथील श्योपुर जिल्ह्यामध्ये दुचाकीची धडक झाल्याच्या मुद्द्यावरुन एका ४५ वर्षीय व्यक्तीचा तरुणाशी वाद झाला. या भांडणामध्ये या तरुणाला या व्यक्तीने बोट दाखवले असता तरुणाने त्याच्या बोटाचा इतका कडकडून चावा घेतला की बोटाचा तुकडाच पडला. पिडीत इसमाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार या तरुणाने बोटाचा हा तुकडा गिळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय शाम माहोर यांच्या गाडीला अझगर खान या तरुणाच्या गाडीने धडक दिल्याने वाद झाला. बाचाबाची झाल्यानंतर हे दोघे एकमेकांना हातवारे करुन आरडाओरड करु लागले. त्यावेळी खानने माझे बोट चावल्याचा आरोप श्याम यांनी केला आहे. ‘शस्त्रक्रियेच्या मदतीने तुटलेले बोट जोडताही आले असते, मात्र खानने बोटाचा तो तुकडा गिळला,’ असं श्याम यांनी पोलिसांना सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button