breaking-newsआंतरराष्टीय
भन्नाट…एका जुन्या विमानाला दिले घराचे स्वरूप; पर्यटकांच्या उड्या
न्यूयॉर्क : विमानावर असलेल्या प्रेमापोटी एका निवृत्त इंजिनिअरने जुन्या विमानाला घराचे स्वरूप दिले आहे. विशेष म्हणजे हे विमानघर पाहण्यासाठी पर्यटकांच्या अक्षरशः उड्या पडत असल्याचे चित्र आहे. ब्रूस कॅम्पबेल असे या इंजिनिअरचे नाव आहे.
ब्रूस यांनी या विमानघराला ‘बोईंग ७२७’ असे नाव दिले आहे. ब्रूस यांनी एक जुने विमान विकत घेतले. त्यांनी ते विमान ऑरगेनो येथील जंगलात ठेवण्याचा निर्णय घेतला. या विमानात सर्व संसारोपयोगी वस्तू आहेत.
गर्दीपासून लांब हिरव्यागार वनराईतील या विमानात ब्रूस आपला वेळ मजेत घालवतात. हे घर पाहण्यासाठी त्यांची मित्रमंडळी रोज त्यांच्याकडे येतात. विशेष म्हणजे ब्रूस यांनी जपानमध्ये देखील असेच दुसरे विमानघर उभारले आहे. त्यांची ही कलाकृती सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरली आहे.