Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय
ब्रेकिंग न्यूज ! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Imran-Khan.png)
कराची । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।
गुजराँवाला येथील रॅलीत इम्रान खान सहभागी झाले होते. रॅलीत अचानक हल्लेखोर घुसला आणि त्याने जवळपास सहा ते सात राऊंड फायर केले. यामुळे पाचजण जखमी झाले आहेत. तर, इम्रान खान यांच्या पायालाही गोळी लागली आहे. पायाला गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. यांसह चार लोक जखमी झाली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, इम्रान खान यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या गजराँवाला येथे इम्रान खान यांच्या पक्षाची रॅली काढण्यात आली होती.