ब्रिटनमध्ये थेरेसा मे यांना दिलासा, विश्वासदर्शक ठरावात विजयी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/theresa-may.jpg)
लंडन- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ब्रेग्झिट समझोत्यावरून अडचणीत आल्यानंतर हुजूर पक्षाच्या खासदारांनीच थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला होता.
ब्रेग्झिट करारावरुन थेरेसा मे यांच्याविरोधात हुजूर पक्षाच्या खासदारांनीच अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी मे यांना पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते आवश्यक होती. मी माझ्या सर्व ताकदीनिशी या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार असे थेरेसा मे यांनी सांगितले होते.
अविश्वास ठरावातील विजय थेरेसा मे यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. थेरेसा मे यांचा पराभव झाल्यास पुन्हा निवडणुका आणि नवा पंतप्रधान येण्याची शक्यता होती. तसेच ब्रेग्झिट करारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे या ठरावाकडे जगभराचे लक्ष लागले होते.
बुधवारी ब्रिटनमधील संसदेत अविश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला. मे यांना ३१७ पैकी २०० मते मिळाली. हुजूरपक्षाच्या ६३ टक्के खासदारांनी मे यांच्या बाजूने मतदान केले. तर ३७ टक्के खासदारांनी त्यांच्याविरोधात मतदान केले. ‘माझ्याविरोधात मतदान करणाऱ्या खासदारांचे म्हणणेही मी समजून घेईन’, अशी प्रतिक्रिया थेरेसा मे यांनी दिली.