breaking-newsआंतरराष्टीय

बोगस कॉल सेंटर प्रकरणात 20 भारतीयांना अमेरिकेत कारावासाची शिक्षा

न्युयॉर्क – अमेरिकेत बोगस कॉल सेंटर चालवून तेथील नागरीकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक केल्या प्रकरणी तेथील 20 अनिवासी भारतीयांना प्रत्येकी 4 ते 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा तेथील न्यायालयाने सुनावली आहे. हे लोक येथे कॉल सेंटर घोटाळा उद्योग चालवत आहेत त्यातून अनेकांना लुबाडण्यात आले असून त्यांना जबर शिक्षा देण्याची मागणी अमेरिकेचे ऍटर्नी जनरल जेफ सेसन्स यांनी कोर्टातील सुनावणीच्यावेळी केली होती.

यातील आरोपींची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना भारतात परत पाठवले जाईल असेही त्यांनी सांगितले. या टोळीने अनेकांच्या आयुष्यभराची कमाई लुबाडली आहे. अनेक वृद्धांना त्यांनी असाह्य केले आहे. त्यांनी फसवलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. सन 2012 ते 2016 या अवधीत ही फसवणूक करण्यात आली आहे.

भारतातील कॉल सेंटरशी संगनमत करून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात आधीही तीन भारतीय नागरीकांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button