बेगम खालिदा झिया यांना जामीन मंजुर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Khaleda_Zia.jpeg)
ढाका – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. 72 वर्षीय खलिदा यांना उच्च न्यायालयाने मार्च महिन्यातच जामीन मंजुर केला होता पण त्यांच्या सुटकेला आव्हान देण्यात आल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत होते.
अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या जामीनाबाबत हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत त्यांना जामीन मंजुर केला. अनाथालयासाठीच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून त्यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्या शिक्षेलाही त्यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून त्याचा निर्णय येत्या 31 जुलै पर्यंत लागणार आहे.
त्यांनी त्यांचे पती व बांगलादेशचे माजी अध्यक्ष झियाउर रहमान यांच्या नावाने एक अनाथालय सुरू केले होते त्याला विदेशातून मिळालेल्या देणग्यांमधून त्यांनी सुमारे अडीच लाख अमेरिकन डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.