breaking-newsराष्ट्रिय

बिहारमधील मेंदुज्वराच्या बळींची संख्या ११३ वर

मुझफ्फरपूर : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्य़ात मेंदुज्वरामुळे (अ‍ॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम- एईएस) आणखी काही बळी घेतल्याने या रोगाला आतापर्यंत बळी पडलेल्यांची संख्या ११३ वर गेली आहे.

श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मंगळवार रात्रीपासून मेंदुज्वराचे २० नवे रुग्ण दाखल करण्यात आले व त्यापैकी काही मरण पावले. मेंदुज्वर झाल्याने १ जूनपासून या रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांची संख्या ३७२ वर पोहचली आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ९३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, फक्त ११८ मुलांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उर्वरित मुलांवर एकतर उपचार सुरू आहेत, किंवा त्यांना गंभीर अवस्थेत पाटण्यातील रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. केजरीवाल हॉस्पिटलमध्ये मंगळवार रात्रीपासून एईएसचे आणखी २ नवे रुग्ण दाखल झाल्याने १ जूनपासून येथील रुग्णांची संख्या १४६ वर गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button