breaking-newsराष्ट्रिय

बस घाटात कोसळली; २१ भाविकांचा मृत्यू

अंबाजी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. ७० भाविकांना घेऊन परतणारी खाजगी बस गुजरातमधील बनासकांठा येथील त्रिशुला घाटात कोळसली. यात २१ जणांचा जागीच मृत्यु झाला. तर ५० भाविक जखमी झाले आहेत. जखमीपैकी काहीची प्रकृती गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे असून, अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही.

नवरात्रीनिमित्ताने गुजरातमधील प्रसिद्ध अंबाजी मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन ७० भाविकांची बस परतीच्या मार्गावर होती. बनासकांठातील त्रिशुला घाटात आल्यानंतर बस खोल दरीत कोसळली. बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. या घटनेत २१ भाविकांचा मृत्यु झाला आहे. तर ५० भाविक जखमी झाले आहेत. जखमीपैकी काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button