breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोल-डिझेल दरवाढीने फरक पडत नाही, कारण मला फुकट मिळतं – रामदास आठवले

पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाहीये, कारण मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळतं असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ”माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसेल, पण इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे हे मला समजतंय, दर कमी व्हायला हवेत”, असंही आठवले पुढे म्हणाले.

ANI

@ANI

I’m not suffering from rising fuel prices as I am a minister. I may suffer if I lose my ministerial post. It’s understandable that people are suffering from rising fuel prices & it’s the duty of the govt to reduce them: Union Minister Ramdas Athawale in Jaipur . (15.09)

राजस्थानच्या जयपूरमध्ये एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी व्हायला हवे. माझ्या पक्षाचीही हीच भूमिका आहे. केंद्र सरकारही आता इंधानचे दर नियंत्रणात आणण्याबाबत आता गंभीरतेने विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर ही जबाबदारी सोपावण्यात आली आहे. पण मला पेट्रोल-डिेझेलच्या दरवाढीने काहीही फरक पडत नाहीये, कारण मी एक मंत्री आहे. त्यामुळे माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. पण माझं मंत्रिपद गेल्यावर ही झळ मलाही बसेल. आठवले पुढे म्हणाले की, इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे हे मला समजतंय, दर कमी व्हायला हवेत, त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, देशभरात पेट्रोल दरवाढीचं सत्र आजही सुरूच आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये 28 पैशांची तर डिझेलच्या दरांमध्ये 19 पैशांची वाढ झाली आहे. परिणामी मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 89.29 रुपयांवर आणि डिझेलचा दर 78.26 रुपयांवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्याने एक लिटर पेट्रोलसाठी 81.91 पैसे आणि डिझेलसाठी 73.72 रुपये मोजावे लागणार आहे. दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये केवळ बुधवारी इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. या दिवशीही इंधनाचे दर कमी झाले नव्हते पण स्थिर होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button