Breaking-newsआंतरराष्ट्रीय
पॅलेस्टाईनच्या मदतीत अमेरिकेकडून कपात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/usa-.jpg)
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने पॅलेस्टाईनला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत दोनशे दशलक्ष डॉलर्सची कपात करण्याची घोषणा केली आहे. विदेश मंत्रालयाने तशी आधिसूचना जारी केली आहे पण त्याची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. पॅलेस्टाईनच्या मदतीतून वगळण्यात आलेला हा निधी अन्यत्र गरजेच्या कामासाठी वळवण्यात येत आहे.
गाझा आणि वेस्ट बॅंकमधील कल्याणकारी योजना आणि लोक गरजेच्या कार्यक्रमासाठी हा निधी अमेरिकेकडून दिला जाणार होता. गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक हल्ले करून तेथील सामान्य जनजीवन उदध्वस्त केले आहे.
पॅलेस्टाईनला शिक्षण, आरोग्य, आणि नागरी सुविधांसाठी अमेरिकेकडून ही मदत दिली जात आहे. पण त्यात कपात करण्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.