Breaking-news
पॅरोलची मुदत संपल्याने लालू पुन्हा तुरूंगात
रांची – पॅरोलची मुदत संपल्याने राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव तुरूंगात परतले. ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांच्या विवाहासाठी तुरूंग प्रशासनाने लालूंना तीन दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. झारखंड उच्च न्यायालयाने 11 मे यादिवशी लालूंना वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. हा आदेश चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष सीबीआय न्यायालयाला मिळाल्यानंतर त्यांच्या जामिनाची अंमलबजावणी होईल, असे समजते.
चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांत लालूंना दोषी ठरवण्यात आले आहे. त्या प्रकरणांत त्यांना वेगवेगळ्या तुरूंगवासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. शिक्षेमुळे लालू मागील वर्षीच्या 23 डिसेंबरपासून रांचीमधील बिरसा मुंडा तुरूंगात आहेत.





