breaking-newsराष्ट्रिय

पूंछमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त

श्रीनगर – भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून संयुक्त पथकाने जोरदार मोहीम सुरूच ठेवली आहे. पूंछ जिल्ह्यातील मंगनार शिखरावरील जंगलात असलेला दहशतवाद्यांचा लपण्याचा अड्डा पथकाला उद्ध्वस्त करण्यात यश आले.या ठिकाणावरून दोन AK-47 रायफल्स जप्त करण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक (एसएसपी) रमेश अंगरल म्हणाले की, गुप्तचरांकडून आम्हाला दहशतवाद्यांचे लपण्याच्या अड्ड्याविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी मंगनारमधील कालसा वनक्षेत्रात एक संशयित जागा दिसली. त्या ठिकाणाची झडती घेतली असता, दोन एके-47 रायफल आणि चार मॅग्जीन आढळले, हा भाग घुसखोरीचा मार्ग होता. एसओजीकडून यासंदर्भात चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button