Breaking-news

पुर्णगीरी भाविकांना डम्परने चिरडले; नऊ जण ठार

पिठोरगड – चंपावती जिल्ह्यातील पुर्णगिरी येथे गेलेल्या भाविकांच्या एका जथ्यामध्ये भरधाव वेगाने जाणारा डम्पर घुसून त्यात 9 भाविक ठार झाले तर अन्य बारा जण जखमी झाले आहेत. हे भाविक उत्तरप्रदेशातल्या बरेलीचे रहिवासी आहेत. ते जथ्याने पुर्णगिरी वर जात असताना वाटेत त्यांना डम्परने ठोकरल्याने ही दुर्घटना घडली.

आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. नवस पुर्ण करण्यासाठी अनेक भाविक या डोंगरावरील देवस्थानला पायी जात असतात. त्याच पद्धतीने हे भाविक पुर्णगिरीवर पायी जात असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर डम्परचा चालक पळून गेला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button