पाडव्याचं गिफ्ट! पेट्रोल प्रति लिटर २० पैसे तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त
![Inflation erupts! Petrol became more expensive again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Petrol-.jpg)
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल प्रति लिटर २० पैसे आणि डिझेल प्रति लिटर १९ पैसे स्वस्त झाले आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमती ८३ रुपये ७२ पैसे प्रति लिटर असतील तर डिझेलची प्रति लिटर किंमत ७६ रुपये ३८ झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत.
दिल्लीत पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर २१ पैसे कमी झाल्या आहेत. दर डिझेलच्या किंमती प्रति लिटर १८ पैसे कमी झाल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलच्या किंमती ७८ रुपये २१ पैसे प्रति लिटर झाल्या आहेत. तर डिझेलच्या किंमती ७२ रुपये ८९ पैसे प्रति लिटर झाल्या आहेत. कालच्या दिवसचा अपवाद गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे जनतेला काही अंशी दिलासा मिळाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होताना दिसते आहे.