breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानात अहमदींचे प्रार्थनास्थळ पेटवले

लाहोर – पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या फैसलाबाद येथे असलेल्या अहमदींच्या प्रार्थना स्थळाला काही समाजकंटकांनी आग लावल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेच्या संबंधात माहिती देताना अहमदी पंथाच्या एका व्यक्तीने सांगितले की सुन्नी मुसलमानांचा एक गट या प्रार्थनास्थळावर चालून आला आणि त्यांनी तेथे मोठी हुल्लडबाजी करून आग लावली. त्यांनी केलेल्या हल्ल्यात अहमदी पंथाचे सहा जण जखमी झाले आहेत.

अहमदी हा पाकिस्तानातील अत्यंत अल्पसंख्य असलेला एक पंथ आहे. या पंथाच्या ठिकाणांवर तसेच वस्त्यांवर सतत हल्ले केले जात आहेत. अहमदी हा पंथ मिर्झा गुलाम अहमद यांनी 19 व्या शतकात भारतीय उपखंडात स्थापन केलेला पंथ आहे. या पंथांच्या संस्थापकांनी स्वत:ला प्रेषित म्हणून घोषित केले होते. पाकिस्तानने 1974 साली अहमदी हे मुस्लिम नाहीत असे जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button