breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान ठार

जम्मू – भारत पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर अर्निया येथे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान ठार झाला. 16 आणि 17 मे च्या मध्यरात्री हीरानगर भागात पाकिस्तानने हा गोळीबार केला त्यात सीमा सुरक्षा दलाचा हा जवान ठार झाला. हा जवान मुळचा पश्‍चिम बंगालचा आहे.

पाकिस्तानी हद्दीतून सुरू झालेला गोळीबार रात्रभर सुरू होता. तो सकाळी थांबला. भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तानी बाजूकडून नेहमीच असे कव्हर फायरिंग केले जाते. त्याला भारतीय बाजूकडून प्रत्युत्तर देण्यात आले किंवा कसे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या जम्मूच्या दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानकडून ही आगळीक सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button