Breaking-newsराष्ट्रिय
पर्रिकरपुत्रांच्या राजकारण प्रवेशासाठी भाजप उत्सुक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Manohar-Parrikar-1.jpg)
गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पुत्रांनी राजकारणात यावे, यासाठी भारतीय जनता पक्षात वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असल्याचे समजते.भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी सोमवारी सांगितले की, पणजी पोटनिवडणुकीत पर्रिकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अभिजात हा पर्रिकरांचा दुसरा पुत्र आहे. भाजपचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी पर्रिकर कुटुंबीयांची नुकतीच सांत्वन भेट घेतली त्या वेळी पक्षाची इच्छा पुत्रांच्या कानी घालण्यात आली. मात्र तिला या पुत्रांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. पणजी पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.