पत्नी बरोबर अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणाऱ्या पतीला अटक
![Telephone bombings in four places; Three arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/arrest-1_20170912029.jpg)
पत्नीवर अनैसर्गिक शरीरसंबंधांची सक्ती केली म्हणून पती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अहमदाबादचे हे प्रकरण असून पत्नीनेच पतीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. नवरा आपल्यावर बुरखा घालण्याची सुद्धा सक्ती करायचा असा आरोपही या महिलेने केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी दोघांचा हा दुसरा विवाह आहे. महिलेला पहिल्या विवाहापासून एक मुलगी आहे. दुसरे लग्न झाले त्यावेळी ती मुलीला आपल्यासोबत दुसऱ्या नवऱ्याच्या घरी घेऊन गेली. संसार सुरु असताना दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. सात महिन्यांपूर्वी दोघे विभक्त झाले.
महिला आता तिच्या आई-वडिलांच्या घरी राहते अशी माहिती महिला पोलीस अधिकाऱ्याने दिली. तक्रारदार महिला पार्लर चालवते. कामावर जाताना नवरा आपल्याला जबरदस्तीने बुरखा घालायला लावायचा असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी केल्यानंतर ४७ वर्षीय नवऱ्याला अटक केली असे पोलीस उपनिरीक्षक रीना बोदात यांनी सांगितले.