पत्नीचे कापलेले शीर हातात घेऊन पती पोहोचला पोलीस ठाण्यात
![Mumbai,Woman doctor commits suicide,Took overdose of amnesia injection,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/murder-crime.jpg)
आग्रा:- दारुड्या पतीला दारु पिण्यापासून रोखणाऱ्या पत्नीची हत्या करुन तिचे शीर धडापासून वेगळे केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. कहर म्हणजे पत्नीचे कापलेले शीर हातात घेऊन या नराधम पतीने थेट पोलीस ठाण्यात हजेरी लावली. आग्र्यातील इत्माद-उद-दौला भागात रविवारी रात्री हा प्रकार घडला.
नरेश असे आरोपी पतीचे नाव असून तो टीव्ही रिपेअर मॅकेनिक म्हणून काम करतो १७ वर्षांपूर्वी त्याचे शांती नामक मुलीशी लग्न झाले. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. नरेश हा पूर्णपणे दारुच्या आहारी गेलेला व्यक्ती असून त्याच्या नेहमीच्या दारु पिण्यावरुन त्याचे आपल्या पत्नीशी वारंवार भांडणं होत होते. वृत्तानुसार, नरेश रविवारी रात्री आपल्या घरी दारु पित बसला होता. यावेळी त्याच्या पत्नीने त्याला दारु पिण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिडलेल्या नरेशने घरात ठेवलेले धारदार चॉपर काढले आणि तत्काळ ते पत्नीच्या गळ्यावर चालवले इतकेच नव्हे त्याने अत्यंत अमानुषपणे तिचे शीर धडापासून वेगळे केले.सकाळी त्यांची मुलं उठली आणि त्यांना आपली आई दिसली नाही. त्यानंतर मोठी मुलगी आपल्या आई-वडिलांच्या खोलीत गेली तर तिला आईचा मृतदेह दिसला. त्यानंतर तिने आपल्या नातेवाईकांना बोलावलं त्यानंतर पोलिसांनी याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि फरार झालेल्या नरेशचा शोध सुरु केला. त्यानंतर नरेश आपल्या पत्नीचे शीर हातात घेऊनच पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, गुन्हा केला तेव्हा आपण दारु प्यायलो नव्हतो असा दावा त्याने पोलिसांशी बोलताना केला तर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने आपण हे पाऊल उचलल्याचा दावा त्याने केला आहे.