पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/modi-with-a.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. बुधवारी आयोजीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ द अवार्ड’ देऊन सन्मानीत करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव गुटारेस यांनी पर्यावरण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ द अवार्ड’ देऊन सन्मानीत केले.
दरम्यान, या हा पुरस्कार देण्याच्या अगोदर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या संबोधनात म्हटले होते की, ‘आज भारतासाठी खूप गौरवाचा दिवस आहे. आज संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे मोदीजींना ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ द अवार्ड’ देण्यात आला आहे. आम्ही पृथ्वीला ग्रह मनात नसून त्याला आम्ही आई मानतो. भारतामध्ये भवन बनवण्याच्या अगोदर धर्तीची पूजा करतात, भूमी- पूजन केले जाते.’
संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव एंटोनियो गुटरेस यांनी देखील मोदींची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरण क्षेत्रात ज्या प्रकारे नेतृत्व केले आहे तश्या प्रकारच्या नेतृत्वाची जगभरात कमतरता आहे. येणाऱ्या दशकात ग्रीन इकॉनॉमीचा मोठा प्रभाव असणार आहे.