नगर-मनमाड रोडवर २३ लाखांचे मद्यार्क जप्त; दोघांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/madyarka.jpg)
अहमदनगर | महाईन्यूज
राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील पथकाने शनिवारी सायंकाळी नगर-मनमाड रोडवरील बाभळेश्वर शिवारात एका ट्रकचा पाठलाग करून २२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १८ हजार लीटर मद्यार्क जप्त केले आहे. या मद्यार्काची अवैधरित्या वाहतूक केली जात होती़. यावेळी एम़एच-१८ ए़ए़ ५५६८ या ट्रकसह चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नगर-मनमाड रोडने बेकायदेशीररित्या दारु तयार करण्यासाठी वापरल्या जाणा-या मद्यार्काची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
माहितीनुसार पथकाने ट्रक चालकला अडविले. यावेळी या ट्रकमध्ये मद्यार्काचे ७५ बॅरल त्यात प्रत्येकी ३४० लिटर मद्यार्क असे एकूण १८ हजार बॅरल लिटर अवैध मद्यार्क आढळून आले. यावेळी वाहनचालक इंद्रसिंग गुलाब भिल (वय ३८ रा. वाडी ता. शिरपूर जि. धुळे) व चंदू अर्जून वानखेडे (४२ रा. आमोदा ता. शिरपूर जि. धुळे) यांना अटक करण्यात आली. ट्रकच्या बॅरलमधील मद्यार्काचे नमुने पृथक्करणासाठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. अहवालानंतर जप्त केलेले रसायन कशापासून तयार करण्यात आले आहे. याप्रकरणी उत्पादन शुल्कचे जवान प्रवीण साळवे यांनी आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. रविवारी अटक केलेल्या दोघांना राहाता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.