नक्षलवाद्यांनी उडवले भाजप खासदाराचे फार्महाऊस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/BJP-1-5.jpg)
रायपूर – छत्तिसगढमध्ये नक्षलवाद्यांनी भाजपच्या एका खासदाराचे फार्महाऊस उडवले. सुदैवाने, नक्षलवाद्यांनी घडलवेल्या स्फोटात कुठली जीवितहानी झाली नाही. छत्तिसगढच्या कांकेर जिल्ह्यातील बोंडानार गावात मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली. या गावात भाजपचे खासदार विक्रम उसेंडी यांचे दोन खोल्यांचे फार्महाऊस आहे. तिथे आलेल्या नक्षलवाद्यांनी प्रथम रखवालदाराला तिथून निघून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी आयईडींचा स्फोट घडवला. त्या स्फोटात फार्महाऊसच्या दोन्ही खोल्यांचे मोठे नुकसान झाले.
मात्र, फार्महाऊसमध्ये कुणीच नसल्याने कुठली जीवितहानी झाली नाही. स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी आज विकास यात्रेदरम्यान संबंधित गावाच्या जवळ असणाऱ्या परिसराला भेट दिली. त्यांच्या भेटीच्या काही तास आधी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला.