breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक ! पत्नीची हत्या करुन तिला ऑनलाइन ठेवले जिवंत

गोरखपूरमधील प्रख्यात सर्जन डॉ धर्मेंद्र प्रताप सिंह याने नेपाळमध्ये उंच कड्यावरुन ढकलून पत्नी राखी श्रीवास्तव उर्फ राजेश्वरीची हत्या केली होती. मात्र या हत्येची कोणालाही माहिती मिळू नये यासाठी तो सतत तिचं सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता. सोशल मीडियावर अपडेट करत पत्नी अद्यापही जिवंत असल्याचं दाखवत त्याने पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला त्याचे दोन सहकारी प्रमोद कुमार सिंह आणि देशदिपक निशाद यांच्यासहित अटक केली आहे.

राखीच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला तिचा दुसरा पती मनिष सिन्हा याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. जून महिन्यापासून राखी बेपत्ता होती. विशेष तपास पथकाने तपास हाती घेतला असता डॉ सिंह याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. गोरखपूरमध्ये डॉ सिंह याचा दवाखाना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राखी गोरखपूरमधून बेपत्ता झाली होती. तिचा भाऊ अमर श्रीवास्तव याने शहापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती’. तपास केला असता पोलिसांना राखी 1 जूनला मनिषसोबत नेपाळला गेली असल्याची माहिती मिळाली. पण मनिष परतला असतानाही ती तिथेच थांबली होती. पोलिसांना डॉ सिंह याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याचे कॉल डिटेल्स तपासले असता राखी बेपत्ता झाली त्यावेळी तोदेखील नेपाळमध्येच होता अशी माहिती समोर आली.

राखीचा मोबाइल मात्र 1 ते 4 जूनदरम्यान सुरु होता. विशेष तपास पथकाने नेपाळमध्ये जाऊन चौकशी केली असता स्थानिक पोलिसांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात एका महिलेचा मृतदेह मिळाला असल्याची माहिती दिली. मृतदेहाची पाहणी केली असता तो राखीचाच असल्याचं निष्पन्न झालं.

यामुळे डॉ सिंह याच्यावरील संशय बळावला. चौकशी केली असता राखी पैशांसाठी आणि संपत्तीसाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण हत्या केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डॉ सिंह याच्या सहकाऱ्यांनी मनिष भारतात परतला असता राखीला आपल्यासोबत बाहेर नेलं. तिला गुंगींचं औष दिलं आणि पोखरा येथे उंच कड्यावरुन खाली ढकलून दिलं’.

राखीची हत्या केल्यानंतरही आरोपी तिच्या मोबाइलवरुन तिचं सोशल मीडिया अपडेट करत होते. मोबाइलचं शेवटतं लोकेशनदेखील 4 ऑक्टोबरला गुवाहाटी दाखवत होतं. राखीच्या कुटुंबालाही ती गुवाहाटीत असावी असं वाटत होतं. डॉ सिंह याने चौकशीत आपण आपल्या सहकाऱ्यासोबत मोबाइल गुवाहाटीला पाठवला होता. त्याने तो तिथेच फेकून दिला अशी माहिती पोलिसांना दिली. आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत रवानगी कऱण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button