Breaking-news
दोन हजारची नोटाबंदी नाहीच- शिवप्रताप शुक्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/shivpratap-shukla-.jpg)
इंदूर : दोन हजारच्या नोटा बंद करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सोमवारी येथे केली. सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई पूर्णपणे थांबविल्याने या नोटा चलनातून लवकरच बाद होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर शुक्ला म्हणाले की, सध्या तरी सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव नाही. गेल्या काही महिन्यांत काही राज्यांत जाणवत असलेली चलनतुटवडा लक्षात घेऊन पाचशे रुपयांच्या नोटांचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणत्याही एटीएममध्ये चलनतुटवडा नाही.