देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona-virus-2-3-1.jpg)
नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. रोजच देशात सुमारे 50 हजारांच्या वर कोरोनाग्रस्त आढळत आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 69 हजार 878 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर 945 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाला आहे. देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 30 लाखांच्या घरात पोहोचला आहे. तर या महाभयावह विषाणूने आतापर्यंत 55 हजार 794 जणांचा जीव घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 22 लाख 22 हजार 577 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. देशात सध्या 6 लाख 97 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. राज्यात शुक्रवारी 14 हजार 161 नवे रुग्ण सापडले असून, दिवसभरात 339 जणांचा मृत्यू झाला. तर 11 हजार 749 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.39 टक्के आहे. तर राज्यात 1 लाख 65 हजार 162 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 6 लाख 57 हजार 450 एवढी झाली आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रात 183 कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.