देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार ६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
नवी दिल्ली – भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. देशात आतापर्यंत २२ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ६४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. एका दिवसात एक हजारांहून आधिक मृत्यू झाल्यामुळे चिंता प्रचंड वाढली आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता २२ लाख १५ हजार ७५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ४४ हजार ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सध्या ६ लाख १५ हजार ९४५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १५ लाख ३५ हजार ७४४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जगभरातील आकडेवारीचा विचार करता कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून त्यामागोमाग ब्राझील आणि भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.