breaking-newsराष्ट्रिय
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३२,३४,४७५ वर
- २४ तासांत ६७,१५१ नवे रुग्ण
नवी दिल्ली – भारतातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत देशात ६७ हजार १५१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून १ हजार ५९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३२ लाख ३४ हजार ४७५ वर पोहोचली आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत २४ लाख ६७ हजार ७५९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर एकूण ५९ हजार ४४९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तसेच सध्या ७ लाख ७ हजार २६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ३ कोटी ७६ लाख ५१ हजार ५१२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख २३ हजार ९९२ लोकांची चाचणी मंगळवारी एका दिवसात करण्यात आली.