देशभरातील शहरांना 10 दिवस दूध-भाजीपाला पुरवठा बंद
![Inflation peaks! Peas Rs. 200 per kg; Vegetable prices skyrocketed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/bhaji-market-.jpg)
- राष्ट्रीय शेतकरी महासंघ
नवी दिल्ली – पुढील 10 दिवस शहरांना दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा न करण्याचा निर्णय राष्ट्रीय शेतकरी महासंघाने घेतला आहे. 1 जून पासून ते 10 जूनपर्यंत शहरांना दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येणार नाही, जर शहरवासीयांज्ना दूध आणि भाजीपाला पाहिजे असेल, तर त्यांना गावचा रस्ता धरावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारांच्या धोरणांचा निषेध म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्याने आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने हे पाऊल उचलावे लागले असे राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे ज्येष्ठ सदस्य आणि भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरुनामसिंह यांनी सांगितले आहे. 62 शेतकरी संघटनांनी य बाबतीतील रणनीती निश्चित केलेली आहे. या दहा दिवसात शहरातील दुकाने, शोरूम्स आणि सुपरमार्केट्सना दूध आणि भाजीपल्यचा पुरवठ करण्यात येणार नाही.
अडत्यांशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवण्यात येणार नाही, आणि या काळात रस्ता रोकोसारखे प्रकार केले जाणार नाहीत. देण्याघेण्याचे व्यवहार शेतकरी परस्परांकडून मदत घेऊन पूर्ण करतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.