Breaking-newsराष्ट्रिय
देवदर्शन घेऊन पर्रिकरांनी सुरू केले कामकाज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/manohar-parrikar.jpg)
पणजी – अमेरिकेहून वैद्यकीय उपचार घेऊन परतलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सकाळी आपल्या खंडोला येथील कुलदेवतेचे दर्शन घेऊन आपल्या नियमीत कामकाजाला सुरूवात केली आहे.
सकाळी त्यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सकाळी ते पणजी पासून 15 किमी अंतरावर असलेल्या देवकी कृष्ण मंदिरात दर्शनाला गेले होते. नंतर त्यांनी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नंतर त्यांनी अधिकाऱ्यांची आपल्या कार्यालयात बैठक घेतली.
वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीची माहिती दिली. अमेरिकेतील तीन महिन्यांच्या उपचारानंतर पर्रिकर कालच गोव्यात परतले आहेत. या तीन महिन्याच्या अवधीत त्यांनी एका समितीकडे सरकारचा कारभार सोपवला होता.