दिल्ली-मुंबई विमानात छेडछाड, ६५ वर्षीय उद्योगपतीला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Vistara-flight.jpg)
विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात ४१ वर्षाच्या महिलेची छेडछाड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. फ्लाइट क्रमांक UK 995 दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या विमानात हा प्रकार घडला आहे. भारतीय वंशाची सिंगापूर येथे राहणारी ४१ वर्षीय महिला मुंबईतील नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी दिल्ली-मुंबई विमानामध्ये हा प्रकार घडला आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पीडित महिलेने थेट सहार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. आरोपीचे नाव अनिल कुमार मूलचंदानी असे आहे.
सोमवारी दिल्लीहून मुंबईला निघालेल्या विमानात दिल्लीचा उद्योगपती अनिल कुमार मुलचंदानी माझ्याकडे चूकीच्या पद्धतीने पाहत होता. प्रवासादरम्यान मला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर याप्रकरणी मी एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. क्रू मेंबर्संनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही घटना सांगितली, असा जबात पोलिसांत पीडित महिलेने नोंदवला आहे. एका पोलिस आधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी अनिल कुमार मुलचंदानी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. आरोपी अनिल कुमार मुलचंदानी यांना त्या महिलेने दोनवेळा समज दिल्यानंतरही त्यांनी तिच्याशी छेडछाड केल्याचे सांगण्यात आले.