breaking-newsराष्ट्रिय
दिल्लीत उद्यापासून सर्व हॉटेल्सही होणार सुरू
![Corona patient numbers rise in Delhi, strict lockdown from today to next Monday; Kejriwal's announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/arvind-kejriwal.jpg)
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अनलॉक ३ मध्ये नाइट कर्फ्यूला हटवले आहे. यासह दिल्ली सरकारने हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वीही केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय दिल्ली सरकारने हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली होती.
प्रायोगिक तत्वावर साप्ताहिक बाजारांना एका आठवड्यासाठी खुले करण्याची परवानगी मिळाली आहे. दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट सुधारला आहे. मात्र कोरोनाची प्रकरण अद्यापही येत आहेत. देशाची राजधानीत गेल्या २४ तासात कोरोनाची १०९३ रुग्ण आढळून आले आहेत. येथे कोरोनाचा रिकव्हरी रेट ८९.०४ टक्के आहे. दिल्लीत आता ७.९९ टक्के सक्रिय रुग्ण आहे, तर २.९३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.