Breaking-newsराष्ट्रिय
तृणमुलशी झालेल्या आघाडीमुळे कॉंग्रेसचेच नुकसान…
कोलकाता – तृणमुल कॉंग्रेसशी कॉंग्रेसने जी आघाडी केली त्यामुळे आमच्या पक्षाचेच अधिक नुकसान झाले आहे अशी जाहीर प्रतिक्रीया कॉंग्रेसचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की निवडणुकीतील मतांची आकडेवारी अिीाण निवडणुकीचे निकाल पाहिले तर ही बाब लगेच लक्षात येते. तृणमुलने आमचा पक्ष कमकुवत करण्याचाच सातत्याने प्रयत्न केला आहे.
काही वेळा हिंसाचाराने तर काहीं वेळा प्रलोभने दाखवून त्यांनी आमचे नेते व कार्यकर्ते फोडले. कॉंग्रेस नेत्यांना फोडण्याचा सततच प्रयत्न या पक्षाकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजवटीवरही सडकून टीका केली. त्यांनी कॉलेज प्रवेशाचेही प्रश्न सोडवता आलेले नाहींत असे ते म्हणाले.