breaking-newsआंतरराष्टीय

तब्बल 10 लाख भारतीय संकटात; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

नवी दिल्ली | महाईन्यूज

अमेरिका आणि इराणमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटोने त्यांच्या कर्मचाऱ्यांना इराकमधून सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केलेली आहे. इराणमध्ये आज युक्रेनच्या विमानाची दुर्घटना झाली असून अमेरिकेच्या तळांवर इराणकडून हल्ले चढविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली असून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचेही बोलले जात आहे.

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इराकमधील बगदादच्या विमानतळावर मिसाईल हल्ला करून इराणचा सर्वात मोठा लष्करी अधिकारी सुलेमानीला मारले होते. यानंतर दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण असून जर या दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाले तर याचा सर्वात मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मात्र, यापुढे पाहिल्यास जवळपास 10 लाख भारतीयांचे प्राण धोक्यात आलेले आहेत.

मध्य पूर्वेमध्ये जवळपास 10 लाख भारतीय नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. तीन दशकांपूर्वी जेव्हा इराकने कुवैतवर हल्ला केला होता, तेव्हा तेथील काही भारतीयांच्या मदतीने सरकारने मोठे रेस्क्यू ऑपरेशन चालविले होते. यावेळी एअर इंडियाच्या विमानांनी सलग 58 दिवस नॉनस्टॉप 488 उड्डाणे करत 1.7 लाख लोकांना बाहेर काढले होते. हे जगातील आजपर्यंतचे दुसरे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरले होते. आज जर अमेरिका आणि इराणमध्ये जर युद्ध झाले तर अन्य मुस्लिम देशही इराणला मदत करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अमेरिकेच्या फौजा आखाती देशांवर हल्ला करण्यास गय करणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button