तजाकिस्तानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/386295-657219-tremors-11.jpg)
- जम्मू-काश्मीर ही हादरलं
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मंगळवारी सकाळी ताजिकिस्तानसह जवळच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगण्यात येत आहे. 7 वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती. भूकंपाचे केंद्रबिंदू ताजिकिस्तानमधील दसहांबेपासून 341 किमी अंतरावर होते. जम्मू-काश्मीरपर्यंत याचे धक्के जाणवले.
मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घराबाहेर पडले. गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के अनेक वेळा जाणवले आहेत. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पहाटे 4.36 वाजता हा भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 होती.
यापूर्वी 9 जून रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 9 जून रोजी सकाळी 8:16 वाजता भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. रिश्टर स्केलवर तीव्रता 3.9 होती. भूकंपाचे केंद्रस्थान श्रीनगरच्या 14 किलोमीटर उत्तरेस आणि गांदरबेलच्या दक्षिण-पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर होते.