Breaking-news
तंत्रज्ञानाचा वापर समानतेसाठी करावा – राष्ट्रपती
नवी दिल्ली – तंत्रज्ञानावर भर देताना त्याचा वापर समानता निर्माण करण्यासाठी कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली येथे केले. आज विज्ञान भवनामध्ये 20 वा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
तंत्रज्ञानाच्या मदतीने जनतेचे सबलीकरण करुन वेगाने प्रगती करण्याची आज पुन्हा एकदा आपण प्रतिज्ञा करुया, असे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, वन आणि हवामान बदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या संस्थांना तंत्रज्ञान पुरस्काराने गौरवण्यात आले.