ट्रम्प-किम जोंग उन शिखर परिषद अखेर रद्द !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/donald-trump-praises-kim-.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यात होणारी शिखर परिषद रद्द करण्यात आली आहे. ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात 12 जून रोजी सिंगापूर येथे शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. मात्र आज डोनॉल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांन पत्र पाठवून ही शिखर परिषद रद्द करण्यात येत असल्याचे कळवले आहे.
गेल्या काही दिवसातील तुमच्या निवेदनांवरून स्पष्ट होणाऱ्या क्रोध आणि वैर या भावनांमध्ये आपली चर्चा होऊ शकत नाही. सबब 12 तारखेची शिखर परिषद रद्द करण्यात येत आहे, असे ट्रम्प यांनी किम जोंग उन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ही शिखर परिषद रद्द होण्याचे संकेत मंगळवार पासूनच मिळत होते. दरम्यान अमेरिकेन आपली विनाशिका यूएसएस मिलियस जपानजवळ तैनात केली आहे. उत्तर कोरियावर दबाव टाकण्यासाठी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.