Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापार
टाटा समूहाचा ‘सुपरअॅप’ लवकरच लॉन्च होणार

टाटा समूह लवकरच ‘वुईचॅट’सारखा सुपर अॅप आणणार आहे. या अॅपमध्ये टाटा समूहाच्या सर्व सेवांचा समावेश असणार आहे. डिसेंबरपर्यंत हा अॅप लॉन्च केला जाणार आहे. हा एक असा सुपर अॅप असेल ज्यामध्ये अनेक प्रकारचे अॅप असतील असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.
या अॅपद्वारे टाटा समूह किरकोळ वस्तूंबरोबरच विमा, अर्थसेवा, आरोग्य आणि बिल पेमेंटसारख्या सुविधा उपलब्ध करणार असल्याचेही सांगितले जाते. सध्या टाटाचे टाटा क्लिक, स्टार क्विक आणि क्रोमा हे अॅप्स आहेत.





