Breaking-newsआंतरराष्ट्रीय
जॉर्जियामध्ये अमेरिकी लष्कराचं विमान कोसळले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/US-Plane-.jpg)
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये ९ जणांना घेऊन जाणा-या लष्कराचे एक मालवाहू विमान कोसाल्याची माहिती समोर आली आहे. सी-130 ‘हर्क्यूलस’ हे मालवाहू विमान बुधवारी रात्री सवान्ना विमानतळाजवळील रस्त्यावर आंतरराष्ट्रीय वेळेनुसार जवळपास रात्री ९ वाजता अपघातग्रस्त झाले. यामध्ये विमानातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमान जॉर्जियाहून अॅरिझोनाच्या टस्कन येथे जात होतं. हे विमान जवळपास ५० वर्ष जुनं होतं अशी माहिती आहे. ‘प्यूटरे रिको एयर नेशनल गार्ड’चं हे विमान होतं आणि विमानातील सर्व प्यूटरे रिको येथीलच होते अशी माहिती आहे. मृतकांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसंच अपघातामागे नेमकं कारण काय होतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही.