breaking-newsआंतरराष्टीय

जॉगिंग करताना सीमा पार केली-भोगला दोन आठवडे तुरुंगवास

पॅरिस (फ्रान्स) – जॉगिंग करताना चुकून सीमा पार केल्यामुळे एका फ्रेंच युवतीला दोन आठवडे तुरुंगवास भोगावा लागल्याची माह्तिी अधिकाऱ्यांनी दिली आहे. सॅडेला रोमन नावाच्या फ्रेंच युवतीची ही कहाणी आहे. सॅडेला रोमन कॅनडात, कोलंबिया येथे आपल्या आईकडे आली होती. कोलंबियाची सीमा अमेरिकेच्या वॉशिंग्टनला लागून आहे. 21 मे रोजी सॅडेला रोमन जॉगिंगसाठी निघाली. जॉगिंग करताना कोलंबियची सीमा पार करून वॉशिंग्टनमध्ये प्रवेश केल्याचे, तेथे काही सूचना फलक नसल्याने, तिला समजलेच नाही. नंतर ती सेल्फी घेत असताना गस्त घालणाऱ्या जवानांनी तिला पकडले. अनधिकृतपणे अमेरिकेच्या हद्दीत प्रवेश केल्याबद्दल तिला संशयित म्हणून 15 दिवस तुरुंगात काढावे लागले.

आपल्याला ताकिद देऊन अथवा दंड करून सोडता आले असते, पण तसे झाले नाही; मला गाडीत घालून नेण्यात आले, माझी सर्व ज्वेलरी काढून घेण्यात आली, असे सॅडेला रोमनने सांगितले. दोन आठवड्यांच्या तुरुंगवासानंतर तिला पुन्हा कॅनडात यायला मिळाले. आवश्‍यक दस्तावेजांविना जो कोणी अमेरिकन हद्दीत प्रवेश करील, त्याला अशीच शिक्षा भोगाची लागेल, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button