जेटलींना आयसीयुमधून हलवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/arun-jaitley-1.jpg)
नवी दिल्ली – किडनी रोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलेले केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाल्यामुळे त्यांना आता अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सूधारणा झाल्याचे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
जेटली यांनी त्यांच्याच नात्यातील एका 65 वर्षीय महिलेने किडनी दान केली आहे. 20 किडनी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर ही रोपण शस्त्रक्रीया केली असून किडनी दान करणाऱ्या महिलेच्या प्रकृतीतही चांगली सुधारणा होत आहे. एम्स रूग्णालयाच्या रेनल ट्रान्स्प्लांट विभागाचे माजी प्रमुख संदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रीया पार पडली. संदीप गुलेरिया हे स्वताही जेटली यांचे कौटुंबिक मित्र आहेत.
जेटली यांनी मधुमेह असून त्यांच्यावर या आधीही काही महत्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडील अर्थ खात्याचा कारभार सध्या तात्पुरत्या स्वरूपात पीयुष गोयल यांना देण्यात आला आहे.