breaking-newsराष्ट्रिय
जेएनयुच्या प्राध्यापकांना शिस्तभंगाच्या कारणावरून नोटीसा
नवी दिल्ली – जेएनयुच्या प्रशासनाने विद्यापीठाच्या 48 प्राध्यापकांना शिस्तभंगाच्या कारणावरून नोटीसा जारी केल्या आहेत. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या काही धोरणांबाबत 31 जुलै रोजी विद्यापीठात संप पुकारण्यात आला होता. त्यात सहभाग नोंदवून या प्राध्यापकांनी शिस्तभंग केला आहे असे त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.
या प्राध्यापकांनी 31 जुलै रोजी फलक फडकाऊन आणि काळ्या फिती लाऊन कुलगुरूंच्या धोरणांचा निषेध नोंदवला आहे. तथापी या नोटीशीवर प्राध्यापकांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. शांततेने केल्या गेलेल्या निदर्शनांना शिस्तभंग म्हणून संबोधणे योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.
विद्यापीठाच्या कार्यकारीणीच्या झालेल्या सभेत या प्राध्यापकांना नोटीसा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.