Breaking-newsराष्ट्रिय

जम्मू- काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील अवनीरा येथे सुरक्षा दलांनी सोमवारी रात्रीपासून शोधमोहीम राबवली. मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.  सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलेले दोन्ही दहशतवादी अल – कायदाशी संबंधित  अन्सार गझवट उल हिंद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते, असे समजते. काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी याच संघटनेचा प्रमुख झाकीर मुसा याचा देखील खात्मा केला होता.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी शुक्रवारी देखील पुलवामा येथील लस्सीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button