जगातील पहिल्या वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा योगेश चुकेवाड यांनी लावला शोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/robo-wireless.jpg)
वॉशिंग्टन : अमेरिकेतील संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या चमूने नुकताच युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावला आहे. ज्याचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन १९० मिलिग्राम आहे. या रोबोचे प्रक्षेपण किरो-७ या अमेरिकन टीव्हीवरून दाखवण्यात आले.
या संशोधनाबद्दल याच विद्यापीठाचे संगणकशास्त्र विभागाचे डॉ. श्याम गोडलाकोटा म्हणतात की, या रोबोसाठी एक लहान ‘ऑन बोर्ड’ सíकट वापरले आहे. या सर्टमधील फोटोव्होडटाइक लेसरच्या साह्यने पंखांना वीजपुरवठा करते. रोबोच्या वजनात भर न पडता वीजपुरवठा करण्याचा हा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे.
संशोधक योगेश चुकेवाड हे भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी आहेत. योगेश यांचे शिक्षण महात्मा फुले विद्यालय येथे झाले. त्यांनी आयआयटी-पवई (मुंबई) येथे बी. टेक., तर अमेरिकेत एम. एस. केले. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टनमध्ये पीएच.डी. करत आहेत.