breaking-newsआंतरराष्टीय

चीनला उपरती: नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश

चीनने प्रथमच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील प्रदेशाचा समावेश नकाशामध्ये भारतात केला आहे. चिनी सरकारी वृत्तवाहिनीनं चीनच्या पाकिस्तानमधील दुतावासावर झालेल्या हल्ल्याची बातमी दिली. यावेळी दाखवलेल्या नकाशात चीननं प्रथमच पाकव्याप्त काश्मीर जम्मू व काश्मीरमध्ये दाखवलं आहे. यामुळे आत्तापर्यंत काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या चीनची भूमिका बदलत असल्याचं मानलं जात आहे. चीनमधली सरकारी प्रसारमाध्यमं चिनी सरकारची अधिकृत भूमिका मांडत असल्यामुळे हा बदल चीन सरकारच्या सांगण्यावरूनच करण्यात आला असावा अशी शक्यता आहे.

चायना ग्लोबल टेलीव्हिजन नेटवर्क या चिनी सरकारच्या मालकिच्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं पाकिस्तान व भारत हे देश या नकाशात दाखवले आहेत. पाकव्याप्त काश्मीरचा समावेश पाकच्या नकाशात करण्यात आला नसल्याचे यावेळी स्पष्ट दिसत आहे. आत्तापर्यंत चीन कायम पाकव्याप्त काश्मीर नकाशामध्ये पाकिस्तानमध्ये दाखवत आला आहे. भारताने यासंदर्भात अनेकवेळा आक्षेपही घेतला होता. मात्र, चीनने कधीही भारताची दखल घेतली नव्हती. आता प्रथमच हा बदल झालेला दिसत आहे.

अर्थात, पाकिस्तान व चीन यांचे घट्ट संबंध बघता पाकिस्तान चीनकडे याची तक्रार करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉकवरही या बदलाचा काही परिणाम होतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला या कॉरिडॉरमुळे धक्का पोचत असल्याचा आक्षेप भारताने वेळोवेळी घेत विरोध केला आहे. या कॉरिडॉरच्या बाबतीतही चीननं भारताचं म्हणणं मान्य केलं तर केवळ पाकिस्तानला चांगला धक्काच बसणार नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे चांगलेच परिणाम बघायला मिळतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button