Breaking-newsआंतरराष्ट्रीय
चीनमध्ये करोनाचे आणखी २४ बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/corona-vrus.jpg)
- १३०० नवीन रुग्ण, मृतांची एकूण संख्या १०६
चीनमध्ये करोना विषाणूने आतापर्यंत आणखी २४ बळी घेतले असून मृतांची संख्या १०६ झाली आहे, तर न्यूमोनियाने आजारी असलेल्यांची संख्या ४५१५ असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तिबेट वगळता सर्व चिनी प्रांतात विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील आरोग्य अधिकाऱ्यांपुढे अभूतपूर्व आव्हान आहे. परदेशात थायलंड ७, जपान ३, दक्षिण कोरिया ३, अमेरिका ३, व्हिएतनाम २, सिंगापूर ४, मलेशिया ३, नेपाळ १, फ्रान्स ३, ऑस्ट्रेलिया ४, श्रीलंका १ या प्रमाणे रुग्णांची संख्या आहे. करोना विषाणूने आतापर्यंत १०६ बळी घेतले असून १३०० नवीन रुग्ण सापडलेले आहेत.