Breaking-newsराष्ट्रिय
गोमांस खाणे बंद केल्यास जमावहत्या थांबतील- आरआरएस नेते
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/bjp-indra-kumar-.jpg)
रांची – लोकांनी जर बीफ खाणे बंद केले तर देशातील जमावहत्या थांबतील, असा अजब दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. राजस्थानमध्ये झालेल्या जमावहत्येवरून विचारलेल्या प्रश्नावेळी ते बोलत होते.
इंद्रेश कुमार म्हणाले कि, हिंसा कुठलीही असो घरातील, जातीतील, पक्षांमधील स्वागतार्ह नसते. परंतु जर लोकांनी गोमांस खाणे बंद केले तर अशा हिंसा थांबविता येऊ शकतात. शिवाय ते पुढे म्हणाले, कोणत्याच धर्मामध्ये गोहत्याची परवानगी दिली जात नाही.
दरम्यान, राजस्थानमध्ये अलवर गावात अकबर खान यांचा गो-तस्करीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.