Breaking-news
खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Supriya-sule-1.jpg)
औरंगाबाद | महाईन्यूज
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा झाला. दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या दोहोंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. औरंगाबादमधल्या पैठणमध्ये ही घटना घडली. यामुळे काही काळासाठी सुप्रिया सुळे यांना कार्यक्रम थांबवावा लागला. सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करत होत्या. मात्र काही काळासाठी हा राडा झाला आहे.