कोलकात्यात बगाडी मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमनच्या 30 गाड्या दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/FIRE.jpg)
कोलकाताच्या कॅनिंग स्ट्रीट परिसरातील बगाडी मार्केटमधील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संपूर्ण परिसरात धुरांचे लोट दिसत आहेत. सुदैवाची बाब म्हणजे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर किती प्रमाणात नुकसान झाले हे समजू शकेल.
प्राथमिक माहितीनुसार, आग लागलेल्या इमारतीच्या वाटेत इतर इमारती आणि काही प्रमाणात लोकवस्ती असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर सर्वप्रथम आग लागली, त्यानंतर ही आग झापाट्याने परिसरात पसरली अशी माहिती आहे.